नगर जिल्हा हादरला...महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना

नगर जिल्हा हादरला...महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नेवासा तालुक्यातील एका महिलेवर चौघांंनी अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्यावेळी शेतात झाडाखाली झोपलेल्या महिलेवर चौघांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या आधी तीन महिन्यापूर्वीही या चौघांनी सदर महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला होता असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन संतोष अण्णासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले व ऋषिकेश काकासाहेब गोरे व संदीप गोरख आगळे सर्व रा. रामडोह ता. नेवासा या चौघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post