तलाठ्यांबाबत अपशब्द वापरल्याने उपजिल्हाधिकारी अडचणीत...तलाठ्यांनी केली बदलीची मागणी

 नगर तालुका तलाठी संघाच्या वतीने तहसील कार्यालय येथे निदर्शने


उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या बदलीची तलाठ्यांनी केली मागणी

तलाठ्यान बद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ तलाठी संघटना आक्रमकनगर प्रतिनिधी-राज्यातील तलाठी,मंडळ अधिकारी,तलाठी संवर्गातील तहसीलदार यांनी आज राज्यभर तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यांचा पार्श्वभूमीवर आज अहमदनगर मध्ये तहसील कार्यालयावर तलाठी संघटनेने निदर्शने करून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.ऑनलाइन प्रक्रिया संगणीकृत सातबारा तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल यांना उद्देशून अपशब्द भाषेचा वापर केल्याबद्दल राज्यातील तलाठ्यांनी तहसीलदार कार्यालय येथे निदर्शने केली.
जोपर्यंत उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची राज्य समन्वयक ऑनलाईन पदावरून हाकलपट्टी करत नाही तोपर्यंत तलाठी संघाच्या वतीने आंदोलन चालू राहतील असा इशारा तलाठी संघटनेच्यावतीने नगर मध्ये देण्यात आला.
           नगर तालुका तलाठी संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठ्यांन बद्दल अपशब्द वापरलाच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली यावेळी रावसाहेब निमसे,ज्ञानदेव बेल्हेकर,कविता वाकळे,गणेश जाधव,राहुल कोळेकर, बी.एन.पुप्पाल,प्रमोद गायकवाड, संतोष पाखरे,हरीश देशपांडे,सोमनाथ गलांडे,सुरेश जेठे,भागिनाथ वाघमारे, दिलीप जायभाय आदीसह तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते
        संघाच्या वतीने पुढे सांगण्यात आले की, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची बदली न झाल्यास दि.12 ऑक्टोंबर रोजी सर्व तलाठी व मंडळधिकारी यांच्याकडील डी.एस.सी.चे कामकाज तहसीलदार यांच्याकडे जमा करण्यात येणार आहे. याच बरोबर दि.13 ऑक्टोंबर रोजी निवडणूक विशेष व आपत्तीकालीन कामकाज वगळता इतर शासकीय कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post