पशुसंवर्धन विभागामार्फत सत्यान्नव लाभार्थीना धनादेशाचे वाटप

 पशुसंवर्धन विभागामार्फत सत्यान्नव लाभार्थीना धनादेशाचे वाटपअहमदनगर - सन २०-२१ वर्षासाठी पशुसंवर्धन विभागाच्या विविध व्यक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत पात्र झालेल्या सत्यान्नव लाभार्थाना पंचायत समितीमध्ये सभापती सुरेखा गुंड उपसभापती डॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले . 

यामध्ये विशेष घटक योजनेमध्ये गाय गटामध्ये आठरा लाभार्थी, शेती गट सात लाभार्थी, पशुखादय मध्ये पसतीस शेतक -याना तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना मध्ये तलंगा गट तेवीस लाभार्थी, शेळी गटात एक , पशुखादय गटात तेवीस शेतकरी असे एकून सत्यान्नव शेतकऱ्या ना धनादेशाचे वाटप करण्यात आले . चालू २०-२१ च्या वर्षासाठी वरील योजनासाठी लाभार्थीकडून अर्ज मागविण्यात येत आहे गरजू लाभार्थ्यानी पाच नोव्हेंबर पर्यत पंचायत समिती  पशुसंवर्धन विभाग येथे आपले अर्ज जमा करावे असे आवाहन सभापती गुंड व उपसभापती पवार यांनी केले. यावेळी रामदास भोर बंडू कडूस प्रविण कोकाटे , रविंद्र भापकर , व्ही. डि. काळे , गुलाब शिंदे , स्वाती कार्ले, सुनिता भिंगार दिवे गटविकास अधिकारी रेश्मा होजगे सह लाभार्थी शेतकरी  उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post