“पंकजा नेमक्या कोणत्या बाजूने आहेत, त्या सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?

पंकजा नेमक्या कोणत्या बाजूने आहेत, त्या सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? पंकजांनी कुठलीतरी एक भूमिका घ्यावी’

“पंकजा नेमक्या कोणत्या बाजूने आहेत? त्या सत्ता पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? कुठलीतरी एक भूमिका घ्यावी. विरोधीपक्ष हा त्यांचाच पक्ष आहे. त्यांचाच पक्ष सरकार पाडायचा प्रयत्न करतोय. ईडी, सीबीआयपासून आयटीपर्यंत जेवढ्या काही केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्या संस्था महाराष्ट्रपुरता केल्या आहेत. महाराष्ट्रात सरकार पाडायचा प्रयत्न केला जातोय. एकीकडे सरकार पाडण्यासाठी त्यांच्या पक्षाने वाट्टेल ते प्रयत्न करायचे. दुसरीकडे सरकार पडणार आहे की नाही पडणार याच्या गोंधळात राहायचं. गोंधळात राहू नये. त्यांनी आजपर्यंत अभूतपूर्व संकटाच्या काळात सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?”, असा देखील प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

“पंकजा यांना सत्ताधारी आणि विरोधकांना सल्ला सल्ला द्यायचा आहे. सल्ला देणारा नेमका कुठेय हे तर कळालं पाहिजे. आपणच विरोधी पक्षात आहात आणि आपण स्वत:च्या पक्षाला म्हणाताय, सत्ताधाऱ्यांनाही बोलाच. एकूण गोंधळलेली परिस्थिती दिसतेय”, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post