भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा....पंकजा मुंडेंची तोफ धडाडणार....

भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा....पंकजा मुंडेंची तोफ धडाडणार.... 



बीड: येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर पंकजा मुंडे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर कोण असणार? पंकजा मुंडे भगवान गडावरून काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post