विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली सुरु...नगरमध्ये राष्ट्रवादी विरुध्द भाजप सामना रंगणार

 विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली सुरु...नगरमध्ये राष्ट्रवादी विरुध्द भाजप सामना रंगणारनगर : विधान परिषदेच्या अहमदनगरसह राज्यातील 8 विधान परिषद आमदारांची मुदत 15 डिसेंबरला संपत आहे. नगरची जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची असून यात महापालिका व नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती मतदार असतात. राज्य सरकारने राज्यातील अहमदनगरसह आठ मतदारसंघांतील मतदारांची माहिती मागविली आहे. निवडणूक कार्यालयांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पात्र मतदारांची माहिती कळवा, असे सांगितलेले  आहे.  जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी किती मतदार पात्र ठरतात याकडे लक्ष आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात दोन टर्मपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.अरूणकाका जगताप हे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. आता राज्यात महाविकास आघाडी असून राष्ट्रवादीच नगरची जागा लढविण्याची शक्यता आहे. अशावेळी भाजपकडून या जागेवर कोणाला उमेदवारी मिळते याचीही चर्चा सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post