अमोल मिटकरींचं वादग्रस्त विधान.. पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान मात्र महाविकास आघाडीला करा

 पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान मात्र महाविकास आघाडीला करा; नांदेडच्या देगलूरमधील प्रचारसभेत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींचं वादग्रस्त विधाननांदेड: देशभरात अनेक ठिकाणी पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुका  होत आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. त्यात राष्ट्रवादी देखील मागे नाही. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी लक्ष्मीपूजनाचा आधार घेत मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला आहे. भाजपचा पैसा घ्या, पण मतदान कांग्रेसलाच करा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 

नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी या ठिकाणी एक जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी मतदारांना वादग्रस्त सल्ला दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post