'इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… रामदास आठवलेंची काव्यात्मक फटकेबाजी....

 

'इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे…  रामदास आठवलेंची काव्यात्मक फटकेबाजी....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थितततीत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाजपा आणि शिवसेना युतीबद्दल भाष्य केलं. आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये आठवलेंनी शुभेच्छा दिल्या.

“सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार कमान… कारण चिपीमध्ये आलं आहे मुंबईवरुन विमान,” असं म्हणत आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. पुढे बोलताना आठवलेंनी आपण अजूनही टूरिझम वाढवलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणाहून विमानं येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे आज राजकारण बाजूला ठेऊन आम्ही एकत्र आलोय, हे सुद्धा आठवलेंनी अधोरेखित केलं. 


मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे एकत्र बसल्याचं पाहून त्यांच्याकडे पाहत, “इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… मला आठवले महायुतीचे गाणे”, असं म्हणत आठवलेंनी आपल्या खास शैलीत सेना भाजपा युतीचा उल्लेख केला. आठवलेची ही टोलेबाजी ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विमानतळासाठी सर्वांनीच एकत्र प्रयत्न केले आहेत, असंही आठवले म्हणालेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post