मोठी बातमी...शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात...भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ

मोठी बातमी...शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात...भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ नांदेड  : शिवसेनेचे 12 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा भाजप नेत्याने दावा केला आहे. भाजपच्या नेत्याने केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे 

राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात भाष्य करत असताना हा दावा केला आहे. बबनराव लोणीकर यांनी म्हटलं, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत. इतकेच नाही तर राज्यात लवकरच सत्ताबदल होण्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर बबनराव लोणीकर यांनी केलेला हा दावा शिवसेनेने खोडून काढला आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. सुभाष साबणे यांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार रॅलीत बबनराव लोणीकर यांनी हा दावा केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे, आशिष शेलारही साबणे यांच्या प्रचारासाठी देगलूर येथे दाखल झाले . 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post