पेन्शन संदर्भात शरद पवार साहेबांचे सरकारला एकावेच लागेल -मा राजेंद्र लोंढे

 पेन्शन संदर्भात शरद पवार साहेबांचे सरकारला एकावेच लागेल -मा राजेंद्र लोंढे 
नेवासा:- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचारी बांधवाना जुनी पेन्शन योजना द्यावीच लागेल कारण तो कर्मचाऱ्याचा संविधात्मक हक्क आहे.असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे नाशिक अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी नेवासा तालुका सहविचार सभेप्रसंगी व नूतन कार्यकारिणी सत्कार समारंभ प्रसंगी केले.    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाअध्यक्ष आपासाहेब जगताप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव सुनील गाडगे ,महेश पाडेकर,शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव उपस्थित होते   यावेळी बोलताना लोंढे यांनी सांगितले की .1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेले नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचारी बांधवाना जुनी पेन्शनची मिळाली पाहिजे या बाबतीत आमदार कपिल पाटील स्वतः शरद पवार साहेब यांना भेटले असून सरकारला पवार साहेबांचे ऐकावेच लागेल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगितले आहे. याबाबतीत पून्हा एकदा आमदार कपिल पाटील यांच्या लक्षात ही बाब आणून दिली जाईल असे लोंढे यांनी सांगितले.शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र सरकारने अधिकृत मान्यता दिलेली  एकमेव संघटना असून आमदार कपिल पाटील,राज्यध्यक्ष अशोक बेलसरे सर यांच्या संकल्पनेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, समाजसुधारक फातिमा बीबी हेल्थ केअर कॅशलेस योजना शिक्षक भारतीच्या आजीव सभासदासाठी कार्यान्वित केली असून त्याचा अहमदनगर जिल्ह्यातील शुभारंभ संजय भुसारी व सिकंदर शेख यांना आजीव सभासद करून करण्यात आला या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिक्षक भारतीचे नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी केले , त्रिमूर्ती संकुलाच्या श्री दादासाहेब घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित नवनिर्वाचित कार्यकारणी सत्कार व नियुक्ती पत्र वितरण व सहविचार सभेप्रसंगी लोंढे बोलत होते . यावेळी बोलताना लोंढे यांनी सांगितले की शासन मान्यता प्राप्त आपली एकमेव संघटना असून उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे बरोबर बैठक लावून प्रश्नाचे निराकरण केले जाईल लोंढे यांनी सांगितले.यावेळी प्रास्ताविकात नेवासा तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यवाह संजय भुसारी यांनी पुढील प्रश्नाकडे लक्ष वेधले1नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी देताना 20% ची अट न घालता सरसकट वरिष्टवेतन श्रेणीप्रमाणे निवड श्रेणी देण्यात यावी , थकीत महागाई भत्ता व नियमित वेतन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अदा व्हावे , 20%40% अनुदानावर आलेल्या शाळांना प्रचलित पद्धतीने अनुदान टप्पा तात्काळ घोषित करावा व अघोषित शाळा तुकड्या अनुदानासाठी घोषित कराव्यात ,थकीत मेडिकल बिल  यांच्यासाठी निधी उपलब्ध व्हावा संच मान्यता अशा विधिध मागण्या मांडल्या.याप्रसंगी जिल्हाअध्यक्ष आपासाहेब जगताप,प्राचार्य सोपानराव काळे ,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे,महेश पाडेकर,गोवर्धन रोडे, रामराव काळे यांची भाषणे झाली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,उपाध्यक्ष सिकंदर शेख, राहुरी तालुकाध्यक्ष संभाजी पवार ,नगर तालुकाध्यक्ष घोरपडे,सोमनाथ बोंतले,संजय तमनर,सतीश जामदार,दत्तात्रय आगवणे,विलास माने, गोरक्षनाथ गव्हाणे,दत्तात्रय घुले,संजय पवार उपस्थित होते. आहेत.यावेळी नेवासा नवनिर्वाचितकार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाला.सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे संजय भुसारी  अध्यक्ष,ज्ञानेश्वर काळे  कार्याध्यक्ष नेवासा

राम कार्जुले प्राचार्य सोपानराव काळे, नबाब शहा, तुकाराम फटांगरे,रामराव काळे,  शेषेराव आहेर गोरक्ष शिंदे ,जयंत पाटील ,नितीन गडाख ,नवनाथ साळवे, गंगाधर कर्डीले,सागर बनसोडे  सुनील इंगळे, रावसाहेब कर्जुले ,संजय काळे , गोरक्षनाथ पाठक, नानासाहेब घुले,चिंतामणी आहेर, सतीश सूरसे,दत्तात्रय काळे

शरद कराड,पोपट आवटे,

पंढरीनाथ शेरकर,,रंगनाथ सातपुते,रावसाहेब गवळी,सुभाष फाटके,भगवान वीरकर,मेहेत्रे शांतीलाल, शेरकर पंढरीनाथ प्रयत्न केले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post