२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी....

 

२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी....राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार असल्याचं मत लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलं आहे. त्यासोबतच त्यामागचं कारणही सांगितलं आहे. पुढचे पंतप्रधान कोण होतील याबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे.

शुक्रवारी लालूप्रसाद यादव यांनी द क्विंटला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. मोदींची पदावरुन हकालपट्टी होईल असं म्हणतानाच त्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं. ते म्हणाले, “देशातील जनता वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे कंटाळली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ मध्ये हकालपट्टी होईल”.

  राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले की, याचे उत्तर आपण नव्हे तर काँग्रेस पक्ष देईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post