शिवाजीराव पालवे यांचे हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन

 आदर्श व्यक्तीमत्व हरपल :-शिवाजी पालवेकोल्हार ता. पाथर्डी येथील सरपंच शोभाताई पालवे यांचे पती शिवाजीराव पालवे यांचे हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते पन्नास वर्षाचे होते. निधनाने कोल्हार, उदरमल, सोकेवाडी, शिराळ चिचोंडी, डमाळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, धारवाडी सह अनेक गावावर शोककळा झाली शिवाजी पालवे हे वृक्षमित्र समाजसेवेसाठी धडपडणारे नेहेमी जनसेवेत असायचे.   शेतीतुन आपला परिवार चालवत असतांना जिद्द व 

प्रमणिकपणा स्मितहस्य तत्परता असणारा तरूण तडपदार नेतृत्व गोरगरिबांना  प्रमाणिकपणे न्याय देणारा जनतेच्या कल्याणासाठी दिवस रात्र धडपड करणारा कोल्हुबाई माता गडाच्या तसेच महादेव मंदीर विकासासाठी कटिबद्ध असणारे परिसरातील सर्व गावातील लोक आदराने सरपंच नावाने हाक मारत. कधीही मोठेपणा न दाखवता गावातील प्रत्येकाच्या काळजात असणारे शिवाजी पालवे नवरात्री च्या निमित्ताने कोल्हार वरून मित्रमंडळी सहीत पायी यात्रा मढी, कानिफनाथ, धामणगाव देवी, मोहटादेवी दर्शन जातांना  हदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. पत्नी, दोन मुले एक मुलगी, आई वडील, दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली कोल्हार गावात जय हिंद सैनिक फौंडेशन अ.नगर  च्या माध्यमातुन 500 वडाची झाडे  व 1000 फळझाडाचे डोंगरी स्मृती उद्यान बनवण्यात आले. कोरोना काळात  मोठ्या जबाबदारीने फवारणी तसचे औषध वाटपाचे काम केले. माझ गाव माझ कुटुंब समजुन गावाची आर्दश गाव कडे वाटचाल सुरू करणाऱ्या या योदधास जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ.नगर व कोल्हार ग्रामपंचात च्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली  आपण कायम जनतेच्या आठवणीत असाल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post