31 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ,आमदार निलेश लंके यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

 दिनांक 31 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

 आमदार निलेश लंके यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन    केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता दिनी सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी चे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे  अंबिका नगर बस स्टॉप शेजारी एडीसीसी बँकेच्या समोर , केडगाव येथे आयोजन केले आहे सदर शिबिरास अहमदनगर जिल्ह्यातील संस्था, संघटना यांचे सहकार्य लाभत आहे. केडगावातील सर्वपक्षीय नगरसेवक व केडगाव नागरिक यांच्या वतीने नगर -पारनेर चे आमदार निलेश लंके यांचा कोविड योद्धा हा पुरस्कार देऊन भव्य नागरी सन्मान केला जाणार आहे. नगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते  शिबिराचे उद्घाटन होणार आहे. तरी संस्थेचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी सर्व नागरिकांना रक्तदान शिबिरात रक्तदान करून उस्फूर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. बागले यांच्या नियोजनात मंचचे पदाधिकारी व सदस्य परीश्रम घेत आहेत. त्यांनी शिबिराच्या नाव नोंदणीसाठी  खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 9422221064 व +91 9890144489, 8208954925.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post