आमदार कपिल पाटील रविवार नगर मधे

 आमदार कपिल पाटील रविवार अ.नगर मधे....      शिक्षक भारतीचे संस्थापक सन्मा.आमदार कपिल पाटील साहेब हे रविवार दि.31आॉक्टोबर रोजी सकाळी 11 वा.अ.नगर मधे जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीने आयोजित केलेल्या जिल्हा मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत अशी माहीती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष मा,दिनेश खोसे यांनी प्रसिद्धि पञकात दिली आहे.

         अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक भारतीने आमदार कपिल पाटील यांची विधान परीषद सदस्यत्वाची सलग पंधरा वर्ष पुर्ण झाल्या बद्दल व जिल्ह्यातील नुकताच जि.प.आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार सोहळा निमित्त जिल्हा शाखेने भव्य मेळावा आयोजित केला असुन नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक भारतीच्या  शिलेदारांनी व   सर्वच प्राथमिक शिक्षक बंधु भगिनिंनी मोठ्या संखेने भव्य कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे यांनी केले आहे.

       या कार्यक्रमासाठी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ.गणेश देवी शिक्षक भारती माध्य.अध्यक्ष आशोक बेलसरे कार्याध्यक्ष सुभाष मोरे तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड व प्राथमिक चे सर्व राज्य कार्य कारणी सदस्य उपस्थित रहाणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस सुनिल मते महिला अध्यक्षा सौ.उषाताई येणारे व जिल्हा कार्यकारणीने कळविले आहे.

       या कार्यक्रमात मा.आमदार कपिल पाटील साहेब 2005 नंतरच्या राज्यातील सर्वच प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन व इतर प्राथमिक/ माध्यमिक शासन दरबारी प्रलंबित असलेल्या  प्रश्नावर मार्गदर्शन करनार असुन जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बंधु भगिनिंनी सकाळी 11 वा.नंदनवन शेजारी सरस्वती लॉन हॉटेल पॕराडाईस पाठीमागे टिळक रोड अ,नगर येथे वेळेत उपस्थीत रहावे असे आवाहन जिल्हा शाखेने केले आहे..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post