दिवाळी पार्श्वभूमीवर कापड बाजारात अतिरिक्त महिला पोलीस बंदोबस्त -उपअधीक्षक संदीप मिटके video

 दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात अतिरिक्त महिला पोलीस बंदोबस्त नेमणार -उपअधीक्षक संदीप मिटकेदीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात होणारी गर्दी विचारात घेता अहमदनगर शहर पोलीस दलाच्या वतीने कापड बाजार व्यापारी असोसिएशन यांची बैठक घेतली त्या बैठकीला आमदार श्री संग्राम जगताप उपस्थित होते.मागील दीड वर्षापासून धोरणामुळे ठप्प झालेला व्यवहार पूर्वपदावर येत आहे आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कापड बाजारात खरेदी करता नागरिकांची झुंबड उडत असते. कोरोना चे नियम पालन करून व्यापार पूर्वपदावर आणण्याचा पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने सदरची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर

बाजारामध्ये गर्दी होऊ नये आणि कोरोना चा संसर्ग पुन्हा वाढ नये याकरता पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे त्या अनुषंगाने व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार मध्ये महिला मोठ्या संख्येने खरेदी करता येत असतात हे ध्यानात घेता कापड बाजारांमध्ये अतिरिक्त महिला पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे असे DySP संदीप मिटके यांनी कळविले.

व्यापारी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आव्हान पोलीस विभागातर्फे करण्यात आलेले आहे. बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप व Dysp संदीप मिटके यांनी कापड बाजारांमध्ये पायी फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. सदरच्या बैठकीस आमदार संग्राम जगताप, उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संपत शिंदे,कोतवाली, ज्योती गडकरी,तोफखाना, भोसले वाहतूक शाखा, API देशमुख भिंगार,, कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे संभव काठेड,  कुणाल नारंग, ईश्वर  बोरा  , प्रतीक बोगवत , विजय गुगळे,  विक्रम मुथा,  आनंद मुथा,  रवी कितनी, धीरज पोखर्णा, केतन मुथा,  संजय  चोपडा, विशाख वैद्य,  प्रकाश  बायड, संजय बोगावत , रवी कराचीवाला ,  धीरज मुनोत , दीपक नावालानी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post