वरिष्ठांच्या जाचास कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्या करण्यापूर्वी वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरलअहमदनगर- नगर-औरंगाबाद रोडवर झाडीत  प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय तरुणाने
 गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्येपूर्वी त्याने ज्या महाविद्यालयात तो नोकरीला होता तेथील वरिष्ठ देशमुख यांचे नाव घेत एक व्हिडिओ व्हायरल करत आरोप केले आहेत.जिल्ह्यातील एका मोठे नाव असलेल्या राजकीय नेत्याचा पर्सनल सेक्रेटरी म्हणूनही त्याने या पूर्वी काम केल्याची चर्चा आहे.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या अंगझडतीत तो काम करत असलेल्या संस्थेचे ओळखपत्र मिळाले आहेत. या प्रकरणी मोठी चर्चा होत असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post