आ.संग्राम जगताप यांच्या विरोधातील तक्रार याचिका न्यायालयाने फेटाळली...

 आ.संग्राम जगताप यांच्या विरोधातील तक्रार याचिका न्यायालयाने फेटाळली...नगर:   नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी जाहीरनाम्यात त्यांनी नगरमधील आयटी पार्क सुरू केल्याचे म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात  एमआयडीसी कार्यालयाने आयटी पार्कला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याचे  कळविले. त्यामुळे आ. जगताप यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचे दिसून येते,’ असा आरोप करीत नगरमधील संदीप  भांबरकर  यांनी १८ सप्टेंबरला नगर न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली होती. २३ सप्टेंबरला प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रार दाखल करून घेतली. 

आमदार जगताप यांच्यासह सहा जणांना प्रतिवादी करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. पाटील यांच्यासमोर झाली. शनिवारी त्यांनी निकाल दिला. तक्रारीत मतदारांना लालूच दाखविल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. यासाठी तक्रारदाराला निवडणूक याचिका दाखल करण्याचा मार्ग आहे. मात्र, कनिष्ठ न्यायालयात हे प्रकरण चालविण्यायोग्य नाही. तक्रारदारालाही हे दाखवून देता आलेले नाही. कलम १५६ (३) नुसार प्रतिवादींविरूद्ध काहीही आदेश देता येऊ शकत नसल्याने न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post