देवेंद्र फडणवीस म्हणतात... मी आजही मुख्यमंत्रीच आहे....

देवेंद्र फडणवीस म्हणतात... मी आजही मुख्यमंत्रीच आहे.... 



नवी मुंबई:  देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी एक   विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. 

मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असंही फडणवीस म्हणाले. आमदार मंदा म्हात्रे या जनसामान्यांचं काम करतात. आगरी, कोळी आणि महिलांच्या विकासाची कामे ते सातत्याने करतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस हाय वेवर महिलांसाठी फिरते शौचालयाची सोय करणं हे फक्त आमच्या ताईच करू शकतात. आमच्या मंदाताई महिलांचं सशक्तीकरण करण्यात नेहमीच पुढाकार घेत असतात, अशा शब्दात फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचं कौतुक केलं. नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post