भाजपमध्ये आल्याने ‘चौकशी’ वगैरे काही नाही, निवांत झोप लागते....कॉंग्रेसमधून भाजपत गेलेल्या नेत्याचे मोठं वक्तव्य...व्हिडिओ

भाजपमध्ये आल्याने ‘चौकशी’ वगैरे काही नाही, निवांत झोप लागते....कॉंग्रेसमधून भाजपत गेलेल्या नेत्याचे मोठं वक्तव्य...व्हिडिओ पुणे:  भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी  दोनच वर्षांपूर्वी काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं.  पाटील यांनी काल मावळमधील एका कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, या प्रश्नाचं उत्तर यावेळी पाटील यांनी दिलं.

'स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात..? मी त्यांना म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे. चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते,' असं पाटील म्हणाले.

 या कार्यक्रमाला विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

व्हिडिओ 
 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post