पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीचीही आत्महत्या

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीचीही आत्महत्या औरंगाबाद:  गंगापूर तालुक्यात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीने स्वतःच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.   हत्या गंगापूर तालुक्यातील टाकळीचीवाडी येथे घडली. घरगुती कारणावरून 55 वर्षीय पतीने48 वर्षीय पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार रविवारी पहाटे गंगापूर तालुक्यातील टाकळीचीवाडी येथील गट क्र. नऊमध्ये घडला. चंपालाल तान्हासिंग बिघोत व गंगाबाई चंपालाल बिघोत अशी मृतांची नावे आहेत. या खुनाचे व आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

बिघोत दांपत्य घरासमोरील ओट्यावर झोपले होते. पहाटे तीनच्या सुमारास चंपालाल यांनी मुलगा राहुलच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर ओट्यावर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात मागच्या बाजूला कुऱ्हाडीने वार केला. गंगाबाई जिवाच्या आकांताने ओरडल्या. त्यामुळे मुलगा जागा झाला. खिडकीतून त्याने पाहिले असता आई रक्ताच्या थारोळ्यात होती, पण दरवाजा बंद असल्याने तो बाहेर येऊ शकला नाही. त्याने तत्काळ दुसऱ्या दरवाजाने बाहेर येऊन नातेवाइकांच्या मदतीने आईला घाटीत नेले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post