नगरमध्ये घरफोड्यांचे सत्र .. बंद घराचा दरवाजा तोडून रोकड पळवली

नगरमध्ये घरफोड्यांचे सत्र .. बंद घराचा दरवाजा तोडून रोकड पळवलीनगर- सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.27) पहाटे घडली.

याबाबत सनी सुरेश भिंगारदिवे (रा.सुखकर्ता कॉलनी, ऑक्झिलइम शाळेजवळ, पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि.26) रात्री 11 ते बुधवारी (दि.27) सकाळी 6 या कालावधीत भिंगारदिवे यांचे बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुमच्या दरवाजाचे लॉक तोडून आतमधील कपाटातील सामानाची उचकापाचक केली. तसेच कपाटात ठेवलेली 60 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post