न्यूझीलंडविरुध्द जिंकायचे तर ‘या’ दोन खेळाडूंना बाहेर काढा, सुनिल गावस्कर यांचा सल्ला

न्यूझीलंडविरुध्द जिंकायचे तर ‘या’ दोन खेळाडूंना बाहेर काढा, सुनिल गावस्कर यांचा सल्ला टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने सलग दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी वाटचाल थोडी कठीण झाली आहे. आता भारताचा पुढील सामना या रविवारी न्यूझीलंड विरुद्ध आहे. समालोचक आणि माजी कप्तान सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीला प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे सुचवले आहे. गावसकर म्हणाले की, भारताला न्यूझीलंडला हरवायचे असेल तर प्लेईंग इलेव्हनमध्ये मध्ये दोन बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

फॉर्मात असलेल्या इशान किशनला मॅच फिनिशर म्हणून आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात सामील करून घेण्याबाबत गावसकरांनी मत दिले आहे. गावसकर स्पोर्ट्स तकवर म्हणाले, ”जर हार्दिक पंड्या खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याचा पर्याय म्हणून इशान किशनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. कारण इशान जबरदस्त फॉर्ममध्ये असून सराव सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या जागी संघ शार्दुल ठाकूरलाही संधी देऊ शकतो.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post