‘स्वराज्य ध्वज’ कार्यक्रम चालतो, मग दसर्‍याच्या इतर कार्यक्रमांना मनाई का? माजी मंत्री राम शिंदे यांचा सवाल...व्हिडिओ

 ‘स्वराज्य ध्वज’ कार्यक्रम चालतो, मग दसर्‍याच्या इतर कार्यक्रमांना मनाई का? माजी मंत्री राम शिंदे यांचा सवाल...व्हिडिओनगर (सचिन कलमदाणे): : जामखेडमध्ये शिवपट्टणम किल्ल्यावर दसर्‍याच्या दिवशी आ.रोहित पवार यांच्या पुढाकारातून स्वराज्य ध्वज उभारणीचा मोठा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची चिन्हे आहेत. या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याचवेळी कर्जत तालुक्यातील राशीन, कुळधरण येथे देवीच्या दसर्‍याच्या दिवशी होणार्‍या धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या भूमिकेवर माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी हरकत घेतली आहे. प्रा.शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी दूरध्वनीवर चर्चा करून आ.रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला एक न्याय व भाविकांच्या श्रध्देला दुसरा न्याय अशी भूमिका कशी घेता असा सवाल उपस्थित केला. 

व्हिडिओ...0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post