महत्त्वाची बातमी...6 कोटी 'पीएफ' खातेधारकांना अलर्ट जारी

 

 महत्त्वाची बातमी...6 कोटी पीएफ खातेधारकांना अलर्ट जारी नवी दिल्ली: जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वास्तविक, कर्मचारी भविष्य निधीने आपल्या सर्व ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. ‘ईपीएफओ’ने आपल्या 6 कोटी पीएफ खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ईपीएफओने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.


EPFO ने ट्विटमध्ये म्हटलं आहे....

ईपीएफओने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ईपीएफओने अलर्टमध्ये म्हटले आहे, ईपीएफओ कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक तपशील विचारत नाही किंवा ईपीएफओ त्याच्या खातेधारकांना कोणताही फोन कॉल करत नाही.

याशिवाय, भविष्य निर्वाह निधीसंबंधी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपण अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करत आहोत किंवा नाही, याची खात्री करावी. अन्य़था हॅकर्स तुमच्या पीएफ खात्याचा अ‍ॅक्सेस मिळवून त्यामधील पैसे लंपास करु शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post