तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना, शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

 शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, प्रचंड हाणामारी, डोंबिवलीत धक्कादायक घटनाडोंबिवली (ठाणे) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. पण तरीही स्थानिक पातळीवर या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने एकमेकांसोबत जुळलेली नाहीत. याचा प्रत्यय डोंबिवलीत बघायला मिळालं आहे. डोंबिवलीत रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जीवघेणी हाणामारी झाली. या हाणामारीआधीचा बाताबाचीचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या हाणामारीत काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पण या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीचे राजकारण चांगलंच तापलं आहे.

डोंबिवलीतील मिलापनगर परिसरात रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. या कामाच्या दर्जाबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. वादानंतर जोरदार हाणामारी सुरु झाली. या घटनेत चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आपसात भिडल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post