गृहमंत्री वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग

गृहमंत्री वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्गमुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

“कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”, असं ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.तसेच, “नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे”, असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post