मोठी दुर्घटना, बस दरीत कोसळून एकाच गावातील 15 जणांचा मृत्यू

 मोठी दुर्घटना, बस दरीत कोसळून एकाच गावातील 15 जणांचा मृत्यू देहरादूनमधील विकासनगरजवळ बुल्हाड बायला रोडवर एक बस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनामध्ये एकाच गावातील 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत. या बसमध्ये 25 जण प्रवास करत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस दरीत कोसळून अपघात झाला. उपविभागीय अधिकारी, पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल  घटनास्थळी पोहोचलं असून बचाव कार्य सुरु केले आहे.

चकराता येथील एसडीएम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, 'पोलीस आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळावर पोहचली असून बचावकार्य सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतेय.' पंतप्रधान नरेंद्र मोदी या दुर्घटनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक बचावकार्य करत आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post