धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास व २,३८,००६ रुपयाचा दंड

 धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास व  २,३८,००६ रुपयाचा दंड


 


अनगर : येथील कर्ज फेडण्यासाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. विहामांडवा शाखेला दिलेला १,९४,६०० रुपयाचा धनादेश न वटल्याप्रकरणी देविदास काशिनाथ करताडे (रा.विहामांडवा गव्हरमेन्ट हॉस्पिटल समोर ता.पैठण जि.औरंगाबाद)  यांना न्यायालय क्रं.१४ अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अमित अ. खंडाळे साहेब यांनी २३८००६ रुपयाचा दंड ठोठावला आहे. व १ महिना शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास पुढील तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

 करताडे यांनी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. विहामांडवा शाखेतून २९/०१/२०१६ रोजी १,००,००० लाख रुपयाचे कर्ज व्यवसाय वाढीसाठी घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यसाठी श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विहामांडवा शाखेला रक्कम रुपये १९४६०० चा धनादेश सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विहामांडवा शाखेचा दिला होता. हा धनादेश  व्यंकटेश मल्टीस्टेट  व्यवस्थापकाने बँकेत भरला असता तो वटला नाही. पैसे भरण्याची वेळोवेळी दखल घेवून सांगितले असता देविदास करताडे यांनी पैसे भरले नाहीत.   त्यामुळे श्री व्यंकटेश मल्टीस्टेट यांनी कर्जदाराविरुद्ध अहमदनगर येथील न्यायालयात केस दाखल केली. सदर केसवर सुनावणी झाली असता श्री अमोल कुलकर्णी यांनी पुरावे सादर केले व फिर्यादी संस्थेतर्फे ॲड.एस.के. खंडीझोड व ॲड. के.ए.जाधव यांनी काम पाहिले व त्यांना ॲड. एस.आर.सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले व सुनावणी अंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अमित अ. खंडाळे साहेब यांनी वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post