पवार म्हणतात केंद्रातील भाजपकडून सत्तेसाठी ऑफर आली होती....चंद्रकांत पाटील म्हणाले...

पवार म्हणतात केंद्रातील भाजपकडून सत्तेसाठी ऑफर आली होती....चंद्रकांत पाटील म्हणाले... 



नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली होती, या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे 'नाचता येईना आंगण वाकडे' म्हणत पवार हे केंद्राकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आलेली ऑफर न स्वीकारण्याइतके कच्च्या गुरुचे चेले नाहीत, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आज नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांनी आपल्याला केंद्रातील भाजपकडून सत्तेसाठी ऑफर आली होती मात्र आपण ती स्वीकारली नाही त्यामुळे तपास यंत्रणेकडणं राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास दिला जातोय, असे म्हटले होते. यावर प्रत्रकाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, केंद्राकडून आलेल्या ऑफरला नाही, म्हणण्याइतके पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत. केंद्राबरोबर असलेल्या सरकारबरोबरच महाराष्ट्रातील सरकर स्थापन करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं असतं, असेही पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post