आज वसूली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीस यांचा सरकारला खोचक टोला...

आज वसूली चालू आहे की बंद?, अमृता फडणवीस यांचा सरकारला खोचक टोला... महाराष्ट्र बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत आहे. भाजपाने मात्र या बंदवर चांगलीच टीका केली आहे. अनेक भाजपा नेत्यांनी या बंदचा निषेध करत राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंद संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “कोणी मला माहिती देऊ शकेल का. आज वसूली चालू आहे की बंद?,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंद नाही हा हॅशटॅगही जोडला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post