शेवगावमध्ये एस.टी.कर्मचार्याची आत्महत्या... भाजपचे आक्रमक आंदोलन... फडणवीस, राजळे म्हणाले...

 

एस.टी.कर्मचार्याची आत्महत्या... भाजपचे आक्रमक आंदोलन... फडणवीस, राजळे म्हणाले...नगर: शेवगाव एस.टी डेपो मधील चालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी आज सकाळी आत्महत्या केली. महाविकास आघाडी सरकारचा आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा जाहीर निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने एस.टी डेपो बंद करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.जो पर्यंत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आंदोलनात म्हणले गेले. त्यावेळेस भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, नगराध्यक्ष वजीर पठाण, चिटणीस भीमराज सागडे, गुरुनाथ माळवदे, तापडिया महाराज, डिगू तात्या काथवटे, कार्यकर्ते एसटी.महामंडळातील सर्व एसटी चालक, वाहक व इतर सर्व स्टाफ उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकार 'वसुली' करून स्वतःचा खिसा गरम करत असताना एसटी कर्मचाऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच. या क्रूर अन्यायामुळेच एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करावी लागली, हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया भाजप तर्फे देण्यात आली आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ.मोनिका राजळे यांनी सदर घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post