जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा इशारा...गावात पुरेसे लसीकरण नसेल तर सरपंचांवर अपात्रतेची कारवाई

 

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा इशारा...गावात पुरेसे लसीकरण नसेल तर सरपंचांवर अपात्रतेची कारवाईसोलापूर जिल्ह्यात  आत्तापर्यंत 64% लसीकरण पूर्ण झाले आहे यामध्ये जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतींचे 100% लसीकरण झालेले आहे अन्य गावांमध्ये मात्र लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. ज्या गावात कोरोना लसीकरण कमी होईल, अशा गावातील सरपंचांना  जबाबदार धरून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  यांनी दिला आहे. सोलापूर जिल्हात ज्या गावातील लसीकरण कमी होईल, त्या गावाचे सरपंचपद धोक्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी इशारा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांचे धाबे दणाणले आहेत. स्वामी यांनी पंढरपुरात येऊन लसीकरणाचा आढावा घेतला. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तसा स्वामी यांनी प्रस्ताव देखील पाठवला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post