धोनीची कमाल... चेन्नई ९ व्या वेळी 'आयपीएल' फायनल खेळणार

 *आयपीएल २०२१ सामना ५७*


*धोनीसेना ९व्या वेळेस आयपीएलच्या अंतिम फेरीत*गौरव डेंगळे (११/१०)


दुबई: 

चेन्नईचा कर्णधार धोनीने आपल्या अनोख्या शैलीत विजयी लक्ष्य पुर्ण करत क्वालिफायर १ च्या झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह पिवळ्या वादळाने ९ व्या वेळेस आयपीएल फायनल मध्ये प्रवेश केला.कोलकाता नाइट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील एलिमिनेटरचा विजेता ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील डीसीशी सामना करेल.

*ऋतुराज-उथप्पा यांची चेन्नई साठी महत्त्वपूर्ण भागीदारी*

१७३ धावांचा पाठलाग करताना, सीएसकेने खराब सुरुवात केली.अनरिक नॉर्टजेने पहिल्याच षटकात सलामीवीर फाफ डू प्लेसिसला बाद केले.ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा ने दुसऱ्या गड्यासाठी विक्रमी ११० धावांची भागीदारी रचून चेन्नईने सामन्यावर नियंत्रण मिळवले.रॉबिन उथप्पा (४४ चेंडूत ६३) तर आयपीएल स्पर्धेत फॉर्म मध्ये असणारा ऋतुराज गायकवाड (५० चेंडूत ७०) या दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.उथप्पा (६३) व नव्याने वरचा क्रमांकवर बडती मिळालेला शार्दुल ठाकूर (०) एकाच षटकात बाद झाले. यांनतर फलंदाजीस उतरलेल्या

अंबाती रायुडू १ धावेवर धावबाद झाला. मोइन अली व कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाला विजयी लक्ष्याचा जवळ नेले.१६ धावा करुन अली बाद झाला.शेवटच्या षटकात ३ चेंडूंवर ४ धावांची आवश्यकता असताना धोनीने चौकारासह विजयी लक्ष्य पुर्ण केले.

*पंत व शॉ च्या खेळीमुळे दिल्लीने केल्या १७२ धावा* 

ऋषभ पंतच्या नाबाद ५१ व पृथ्वी शॉच्या ६० धावांमुळे दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १७२/५ ची आवाहनात्मक धावसंख्या उभारली.पंतने वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर शिमरॉन हेटमायर (२४ चेंडूत ३७) यांच्यासह पाचव्या गड्यासाठी ८३ धावांची भक्कम भागीदारी केली.पंतने ३ चौकार आणि २ षटकार ठोकले.  सलामीवीर पृथ्वी शॉ (३४ चेंडूत ६०) खेळी करत दिल्लीला धमाकेदार सुरवात करुन दिली.या खेळीत त्याने ७ चौकार व ३ षटकार ठोकले.पॉवरप्लेमध्ये शिखर धवन (७) व श्रेयस अय्यर (१) यांना जोश हेजलवूडने बाद केले,तर वरचा क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या अक्षर पटेल १० धावा करु शकला. 

४ बाद ८० धावांवर एकत्र येताना, हेटमायर व पंत यांनी सुरुवातीला काही एकेरी आणि दुहेरी धावा घेत संघाला अडचणीतून बाहेर काढले.हेटमायरला १८ व्या षटकात सहकारी वेस्ट इंडियन ड्वेन ब्राव्होने बाद केले. पंतने आपली सुरेख फलंदाजी सूरू ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले.


*संक्षिप्त धावफलक*


दिल्ली कॅपिटल : २० षटकात ५/१७२ ( पृथ्वी शॉ ६०, ऋषभ पंत ५१*,हेजलवूड २/२९)

चेन्नई सुपर किंग्स : १९.४ षटकात ६/१७३ ( ऋतुराज गायकवाड ७०, रॉबीन उत्तप्पा ६३, टॉम कूरम ३/२९)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post