रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या वतीने ओंकारनगर शाळेला प्रिंटर भेट.

 रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या वतीने ओंकारनगर शाळेला प्रिंटर भेट.


मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण.नगर - अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील आय.एस.ओ.मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेला रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने प्रिंटर भेट देण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्ष शशी झंवर, सचिव देविका रेळे,लिटरसी डायरेक्टर प्रतिभा धूत, सदस्य गिता गिल्डा,प्रभा खंडेलवाल, वैशाली कोलते, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षिका वृषाली गावडे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सविता लोखंडे, सदस्य रेश्मा पानसरे, कविता वर्तले, दुर्गा घेवारे, प्रियंका लोळगे उपस्थित होते.

लिटरसी डायरेक्टर प्रतिभा धूत यांच्या पुढाकाराने व गिता गिल्डा, प्रभा खंडेलवाल, वैशाली कोलते,सुरेखा मनियार, ज्योती गांधी, नंदिनी जग्गी यांच्या मदतीने शाळेला प्रिंटर भेट देण्यात आला.तसेच वैशाली कोलते यांनी शाळेला वर्षभर पुरतील एवढे छपाईचे कागद दिले.

ओंकारनगर शाळेला आवश्यक ती सर्व मदत करु,असे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्ष शशी झंवर म्हणाल्या.दिवाळी सणाला फटाके न वाजवता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा,असे लिटरसी सदस्य गिता गिल्डा म्हणाल्या.

ओंकारनगर शाळेशी गेल्या सात वर्षांपासून अतूट नाते निर्माण झाले आहे.शाळेतील बाग,शाळेचे प्रसन्न वातावरण,उत्साही शिक्षक, गुणवंत विद्यार्थी यामुळे शाळेत नेहमी यावेसे वाटते.तसेच शाळेला मदत करावीशी वाटते,असे रोटरीच्या लिटरसी डायरेक्टर प्रतिभा धूत म्हणाल्या.

ओंकारनगर शाळेच्या यशामध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी,मिडटाउन,सेंट्रल,इंटिग्रिटी,सर्व सामाजिक संस्था, अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी, प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण,पालक, देसाई परिवार, सहकारी शिक्षक,विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे, असे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमॄत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले.तर सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post