सर्व असंतुष्टांना चीत करण्याची ताकद...आ.लंके यांनी जि.प.निवडणुकीचे रणशिंग फुंकले...


पारनेर तालुक्यात सर्व असंतुष्टांना चीत करण्याची ताकद...आ.लंके यांनी जि.प.निवडणुकीचे रणशिंग फुंकले...  नगर : पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या मांडओहळ धरणातील पाण्याचे जलपूजन आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आमदार लंके यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांना टोले लगावले. सलग तीन वर्षे मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकाचे नुकसान झाले. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतील. नुकसान भरपाई ही मिळेल राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

आमदार लंके पुढे म्हणाले, मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे. मतदारसंघात आलेला विकासनिधी हा माझ्या माध्यमातून येतो. काहींचा परस्पर गुपचूप उद्घाटन करण्याचा तो प्रकार सुरू आहे. तो चुकीचा आहे त्या कार्यक्रमांना शासकीय अधिकारी व ठेकेदार देखील उपस्थित नसतात. 

राज्यात व अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकी बाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल ते पाहू. मात्र पारनेर तालुक्यात मी विरूध्द सर्व असंतुष्ट असाच सामना होईल मात्र या सर्वांना चीत करण्याची ताकद आमच्यात आहे, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

 यावेळी सभापती प्रशांत गायकवाड, अशोक कटारिया, संजीव भोर, अॅड. राहुल झावरे, बापू शिर्के, बाळासाहेब खिलारी, रामदास दाते, शशिकांत आंधळे, चंद्रभान ठुबे, उद्योजक किशोर ठुबे, उपविभागीय अभियंता व्ही.टी.शिंदे उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post