आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल

 

आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने पहिल्यांदाच मीडियासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. आमच्या जीवाला धोका आहे, असं क्रांती रेडकरने सांगितलं.  क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीने सांगितले. वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थान केले जातील. अनेक कागदपत्रं तयार केली जातील. त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात मोठी गोष्ट आहे. ते हे लोकं सिद्धच करू शकणार नाही. कारण हे सर्व खोटं आहे, असं त्यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post