ऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करा...सायबर पोलिसांचे आवाहन

ऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करा...सायबर पोलिसांचे आवाहन 



मुंबई :   सणासुदीच्या काळात ऑनलाइन भामटे सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांनी फेस्टिव्हल ऑफरमध्ये खरेदी केलेल्या वस्तूच्या पार्सलमध्ये भलतीच वस्तू पाठवून ग्राहकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे ऑनलाइन मागविलेले पार्सल उघडताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे गरजेचे आहे. कारण, यातून फसवणूक झाली तर सायबर सेलला तक्रार करताना पुरावे लागतात. त्यामुळे हा व्हिडीओ आपल्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरतो. 

अनेकदा ऑनलाइन वस्तू आल्यानंतर पार्सल फोडल्यावर त्यात मोबाइलऐवजी साबण, कॅमे-याऐवजी वीट किंवा दगड मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पार्सल घेण्यापूर्वी ते पार्सल मागविले तिथूनच आले आहे का, याची तपासणी करावी. तसेच पार्सल घेतल्यानंतर ते पार्सल कुरिअर बॉयसमोर किंवा रिटेलरसमोर उघडून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे. 

 

ऑनलाइन वेबसाइटवरून मागवलेल्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू मिळाल्यास सुरुवातीला ज्या कंपनीकडून ती वस्तू मागविली, त्या कंपनीकडे आणि रिटेलरकडे तक्रार करावी. तसेच त्या वस्तूचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तसेच सायबर सेलकडे तो व्हिडीओ सादर करून तक्रार दाखल करावी.

दिवाळीच्या काळात विविध ऑफरचे आमिष दाखवत सायबर ठग फसवणूक करत आहेत. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा. तसेच पार्सल उघडताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post