बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं...भर व्यासपीठावर मुख्यमंत्री ठाकरेंचा राणेंवर प्रहार

 बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं...भर व्यासपीठावर मुख्यमंत्री ठाकरेंचा राणेंवर प्रहार सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री आणि नेते तसेच भाजप नेतेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केलं आणि कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं, तळमळीनं बोलणं वेगळं आणि मळमळीनं बोलणं वेगळं असा टोला त्यांनी लगावला. नजर लागू नये म्हणून काळा टीका लावावा लागतो अशी काही लोकंही इथं उपस्थित आहेत. पण कोकणची लोकं हुशार आहेत. ते डोळे मिटून शांत राहत नाहीत. म्हणूनच त्यांनी विनायक राऊतांना निवडून दिलं आणि मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं, अशा शब्दात नारायण राणेंवर टीका केली. नारायणराव आपण लघु उद्योग खात्याचे मंत्री आहात पण केंद्रीय मंत्री आहात. विकासकाम आपण नक्की कराल, असं ते म्हणाले. Narayan Rane : मुख्यमंत्र्यांना उद्देशून नारायण राणे म्हणाले, 'उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनं मी इथं विकासकामं केली'आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको- नारायण राणे 
यावेळी नारायण राणे म्हणाले की, आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमानं पाहिलं आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं, असं ते म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post