गिरीश महाजन ॲक्शन मोडमध्ये, बंडखोर नगरसेवकांची घरवापसी स्थायी समिती निवडणुकीपूर्वी शिवसेनेला झटका

 गिरीश महाजन जळगावमध्ये ॲक्शन मोडमध्ये, बंडखोर नगरसेवकांची घरवापसी, स्थायी समिती निवडणुकीपूर्वी शिवसेनेला झटकाजळगाव: महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जळगावात गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपमधील 30 नगरसेवकांनी बंड पुकारत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले होते. काही काळ उलटत नाही तोच जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केली. भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. आगामी काळात होणार्‍या स्थायी समितीच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला पाठींबा देणारे भाजपचे 3 बंडखोर नगरसेवक स्वगृही परतल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post