भाजपमधून मोठं आउटगोइंग, अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे स्वगृही परतणार

 नांदेड: माजी मंत्री तथा भाजपचे  प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर पाटील लवकरच कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक शंकरनगर ( ता. बिलोली ) येथे झाली. 

भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी ही बैठक खतगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. खतगावकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, आम्ही कोणत्याची पक्षांशी बांधील नाहीत, अशी भूमिका या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माडंली. मेळाव्याला बिलोली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत खातगावकरांनी अंग काढून घेतल्याचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत. तीन वेळा बिलोलीतून आमदार व नांदेडचे खासदार म्हणून खतगावकर निवडून आले. राज्यमंत्री राहिले. सात वर्षांपूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या  कार्यपद्धतीवर ठपका ठेवत त्यांनी कॉंग्रेस सोडली होती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post