विकासकामांची भूमिपूजने आणि राष्ट्रवादीत 'इनकमिंग'....आ.निलेश लंकेच्या धडाक्याने विरोधक घायाळ

 

विकासकामांची भूमिपूजने आणि राष्ट्रवादीत 'इनकमिंग'....आ.निलेश लंकेच्या धडाक्याने विरोधक घायाळनगर: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आ. निलेश लंके जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. पारनेर मतदारसंघात‌ समाविष्ट असलेल्या नगर तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन करताना आ.लंके शिवसेनेला हादरे देत असून अनेक गावांतील आजी माजी पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. 

 कामरगाव येथील कार्यक्रमात अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर प्रवेश केला.  आ.लंके यांच्या पुढाकाराने पुढील विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

१)मौजे. खारेकर्जुने  ते हिंगणगाव रस्ता सुधारणा करणे-३००.०० लक्ष

२) मौजे.निमगाव वाघा ते कापसे वस्ती रस्ता सुधारणा करणे-९२.९६ लक्

३) मौजे.बाबूर्डी घुमट येथे रस्ता करणे -६०.०० लक्ष

४) मौजे.बाबुर्डी घुमट येथे अंतर्गत रस्ता करणे -२०.०० लक्ष

५) मौजे.अस्तगाव येथे रस्ता सुधरणा  करणे-१५०.०६ लक्ष

६) मौजे सारोळा कासार दरे मळा रस्ता सुधारणा करणे-१०६.५९ लक्ष     

७) मौजे कामरगाव येथे रस्ता सुधारणा करणे-२२४.७१ लक्ष

       

            यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी,निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,तसेच मतदार संघातील विविध गावचे सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post