ऐन नवरात्रीत ५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा खून... नगर तालुक्यातील घटना


ऐन नवरात्रीत ५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा खून... नगर तालुक्यातील घटना नगर:  हुंड्याचे पाच लाख रूपये न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ  करून तिचा खून  केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील  अरणगाव  येथे घडली. योगिता नीलेश दळवी (वय 22 रा. अरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयत योगिताचे वडिल देवराम आसाराम गव्हाणे (वय 52 रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

योगिताचा पती नीलेश बाळासाहेब दळवी, सासू आशा बाळासाहेब दळवी, सासरा बाळासाहेब रामभाऊ दळवी, भाया पप्पु बाळासाहेब दळवी, जाव मेघा पप्पु दळवी (सर्व रा. अरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. गव्हाणे यांच्या मुलीचे नीलेश दळवी याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नावेळी सासरच्यांनी पाच लाख रूपये हुंडा मागितला होता. हुंडा दिला नाही, म्हणून सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. योगिताने फोन करून माहेरच्या लोकांना हा प्रकार सांगितला होता.

योगिता तिच्या घरी असताना आरोपींनी तिला गळफास देवुन जीवे ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. योगिताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post