...तर मीच मुख्यमंत्री झालो असतो... ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

 

...तर मीच मुख्यमंत्री झालो असतो... ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोटनाशिक: राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ आज, शुक्रवारी (दि. १५) पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने 'महाराष्ट्र टाइम्स'शी संवाद साधताना त्यांनी कौटुंबिक, सामाजिक व राजकीय जीवनातील संघर्षपट उलगडला.  'शिवसेना सोडतानाचा काळ सर्वांत कठीण होता. परंतु, ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मला शिवसेना सोडावी लागली. त्याचे तोटेही मला सहन करावे लागले. शिवसेना सोडली नसती, तर शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री मीच राहिलो असतो. 'मातोश्री'वर गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हे सांगितले होते'.

 'ज्यांच्या सभेत आपण भाषणे दिली, ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री झाले. माझे अनेक सहकारी पुढे गेले. मी मुख्यमंत्री वा केंद्रीय मंत्री होऊ शकलो नाही. त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यात अर्थ नाही. परंतु, मी शिवसेना व काँग्रेस सोडली नसती, तर मुख्यमंत्री नक्कीच झालो असतो', अशी भावना त्यांनी व्यक्त केली. एकेकाळी काँग्रेस नेतृत्वाने संपर्क करून आपल्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. परंतु, ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोटही भुजबळ यांनी केला. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post