आदित्य ठाकरे देशाचंही नेतृत्व करतील, थोरातांची स्तुतीसुमने

 

आदित्य ठाकरे देशाचंही नेतृत्व करतील, थोरातांची स्तुतीसुमनेनगर : संगमनेरमधील दंडकारण्य अभियान आनंद मेळाव्यानिम्मित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे आणि विश्वजीत कदम यांचं कौतुक केले.  ते दोघे राज्याचं नेतृत्त्व करतात तसंच देशाचंही नेतृत्त्व करतील, अशा शब्दात दोन्ही युवा नेत्यांचं कौतुक बाळासाहेब थोरात केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी आदित्य ठाकरे यांना पर्यावरण खातं कसं मिळालं यासंदर्भात माहिती देखील दिली.

महाराष्ट्राचं नेतृत्त्व करायचं म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागाची, तिथल्या नव्या प्रयोगांची ओळख असली पाहिजे म्हणून आदित्य ठाकरेंशी चर्चा करायची होती. आदित्य ठाकरेंना कोणतं खातं पाहिजे विचारलं होतं, तेव्हा त्यांनी पर्यावरण आणि पर्यटन खातं घेतो, असं सांगितलं. मुंबई पाहायची म्हणजे काय करायचं?, असा प्रश्न होता. आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेचं पर्यटन त्यांनी सुरु केलं. रोजगार आणि आर्थिक उत्पन्न आहे.पर्यावरणाच्या बाबतीत झाडं, फुलं , पानं फळ यांची आपल्यापेक्षा जास्त माहिती आदित्य ठाकरे यांना आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. पर्यावरणाचा विषय आहे म्हणल्यावर त्यांना बोलावलं पाहिजे म्हटलं आणि ते यायला तयार झाले, असंही थोरात म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post