अजितदादांसमोर विरोधकांचे डिपॉझिट का जप्त होतं? पुतणे रोहित पवारांनी सांगितले महत्त्वाचे कारण....

अजितदादांसमोर विरोधकांचे डिपॉझिट का जप्त होतं? पुतणे रोहित पवारांनी सांगितले महत्त्वाचे कारण.... मुंबई :  राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार  रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करत आजचा अजितदादांसोबतचा आलेला अनुभव शेअर केला आहे. तसंच विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे, अशी कृतज्ञताही व्यक्त केलीय.

अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबतीला आज रोहित पवारही होते. अजितदादांच्या नियमानुसार आज सकाळीच म्हणजे सहाच्या ठोक्याला दादांनी काम सुरु केलं. दादांचं नेहमीच काम बघितलेल्या रोहित पवारांना आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भुरळ पडली.

भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा पवार… गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही, असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय.आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन अजितदादांनी आढावा बैठक घेतली. विकास कामं करताना दादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे, असंही रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post