नगर येथे मोफत जयपूर फूट व कृत्रिम हात शिबीराचे आयोजन

 पंडीत ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे मोफत जयपूर फूट व कृत्रिम हात शिबीराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रमनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल व पंडीत ऍक्सिडेंट हॅास्पिटलच्यावतीने दि.20 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत जयपूर फूट व कृत्रिम हात बसविणेचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने सक्कर चौक येथील पंडीत ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे हे शिबीर होणार आहे. काही कारणांनी पाय गमावलेल्या किंवा हात गमावलेल्यांच्या आयुष्यात पुन्हा उमेद आणण्याचा प्रयत्न यानिमित्त करण्यात येत असल्याचे रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी सांगितले.
 
डॉ.राहुल पंडीत व  डॉ.दिलीप बागल यांनी सांगितले की, दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड देत परावलंबी जीवन जगावे लागते. दिव्यांगांची होणारी कुचंबणा लक्षात घेवून सामाजिक बांधिलकी जपत रोटरी सेंट्रलने विकलांग सहाय्यता योजनेंतर्गत या मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. दिव्यांगांसाठी जयपूर फूट तसेच कृत्रिम हात हे वरदान ठरणारे आहे. या तीन दिवसीय शिबिरात लाभार्थींच्या अवयवासाठी पूर्व मोजणी केली जाणार आहे. त्यानुसार उच्च दर्जाचे जयपूर फूट, कृत्रिम हात, पोलिओ कॅलिपर तयार केले जातील. डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात  प्रत्यारोपण शिबिरात लाभार्थींना हे कृत्रिम हात पाय बसविण्यात येतील. सर्व कृत्रिम पाय व हात रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत पूर्णत: मोफत दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाबाबत फारशी माहिती नसते. मात्र रोटरी सेंट्रलच्या या उपक्रमामुळे याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच गरजूंना स्वावलंबी जीवन जगण्यास मोठा हातभार लागणार आहे. शिबिरासाठी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या सन २०२३-२४ च्या नियुक्त प्रांतपाल रो. स्वाती हेरकल व रोटरी सेंट्रल चे माजी प्रांतपाल रो. शिरीष रायते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. पुढील काळात दरवर्षी असा उपक्रम राबविणार असल्याचे डॉ.बागल यांनी सांगितले.

शिबिरासाठी 20 ऑक्टोबर पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. गुगल फॉर्म नोंदणी लिंकसाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क - ईश्वर बोरा (9823799998),  विलसन (9561351395), सुंबे (9637324415).  जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रोटरी सेंट्रलचे खजिनदार रो. धीरज मुनोत, रो. प्रसन्न खाजगीवाले व रोटरी सेंट्रलच्यावतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post