क्रूझ ड्रग्ज पार्टी...'एनसीबी'ने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या जवळचा व्यक्तीही सोडला...

 क्रूझ ड्रग्ज पार्टी...'एनसीबी'ने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या जवळचा व्यक्तीही सोडला... आता देवेंद्र फडणवीस यांनी केला गौप्यस्फोटमुंबई : मुंबईत समुद्रातील क्रूझ  ड्रग्ज पार्टी प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी तसेच भाजपवर आरोप केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आलं. काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिलं. मात्र तो क्लीन होता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मात्र हा गौप्यस्फोट करताना फडणवीस यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही.


“एनसीबीच्या कारवाईत अनेक लोकांना पकडण्यात आलं होतं. यातील जे लोक क्लीन होते त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होतं, त्यांना एनसीबीने पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. याच्याविरोधात एखादी संस्था काम करत असेल तर आपण त्या एजन्सीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हादेखील होता. तो क्लीन असल्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. ते कुठल्या पक्षाचे होते किंवा नव्हते हा मुद्दाच येत नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post