सुपरस्टार ख्रिस गेल 'आयपीएल' मधून बाहेर... पंजाब किंग्जला धक्का...

 सुपरस्टार ख्रिस गेल 'आयपीएल' मधून बाहेर... पंजाब किंग्जला धक्का...मुंबई : आयपीएल स्पर्धेतील ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पंजाब किंग्जला  मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख बॅट्समन आणि टी20 क्रिकेटचा सुपरस्टार ख्रिस गेल  याने आयपीएल स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज (शुक्रवारी) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाबची महत्त्वाची मॅच आहे. त्या मॅचपूर्वीच गेल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.


गेलनं सतत बायो-बबलमध्ये राहण्यानं आलेल्या थकव्यामुळे ही स्पर्धा सोडली आहे. पंजाब किंग्जनं गेलच्या वतीनं ही माहिती दिली आहे. ‘गेल्या काही महिन्यांपासून मी क्रिकेट वेस्ट इंडिज, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि आता आयपीएलच्या बायो-बबलचा भाग आहे. मला मानसिकदृष्ट्या स्वत:ला फ्रेश ठेवायचं आहे. त्यानंतर दुबईमध्येच होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजला मदत करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मी आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.' असं स्पष्ट केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post