नगर-जामखेड रोडवर आठवड घाटात अपघातात १ ठार ४ जखमी

 नगर-जामखेड रोडवर आठवड घाटात अपघातात १ ठार ४ जखमीनगर- भरधाव वेगात जाणार्याअ कारचा नगर-जामखेड रोडवरील आठवड घाटात भिषण अपघात होऊन या अपघातात कार चालक जागीच ठार झाला तर कार मधील अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि.१३) रात्री १०.३० च्या सुमारास घडला.

या अपघातात कार चालक राहुल रतीलाल महाजन (वय ३०, रा.जळगाव) हा जागीच ठार झाला तर भूषण रविंद्र भंगाळे, रोहित दिवाकर चौधरी, राजेशकुमार, सुदर्शन बालाजी टेकाळे (सर्व रा.चिंचवड, पुणे) हे जखमी झाले आहेत. 

याबाबत भूषण रविंद्र भंगाळे (वय २५, रा.चिंववड, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.१५) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भंगाळे व अन्य चौघेजण कारमध्ये नगर-जामखेड रोडने जात असताना आठवड घाटात कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले व कारचा अपघात झाला. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या मयत वाहन चालक राहुल महाजन याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post