विवाहितेचे अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल....मनसेने संबधित तरूणाला धुतला...

विवाहितेचे अश्लिल व्हिडिओ काढून ब्लॅकमेल....मनसेने संबधित तरूणाला धुतला... वसई : विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओडून, तिचे अश्लील व्हिडीओ काढत ब्लॅकमेल करणाऱ्या   तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

मुंबईजवळच्या वसई-नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवार 8 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. मनोज थोरात असे चोप दिलेल्या तरुणाचे नाव असून तो मुंबईतील चुनाभट्टी येथील राहणारा आहे.

 तरुण मागच्या काही महिन्यांपासून विवाहित महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून तिचा पाठलाग करणे, ब्लॅकमेल करणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देणे असे प्रकार करत होता. पीडित महिला कंटाळून मुंबईहून वसई नायगाव येथे कुटुंबाच्या सोबत राहण्यासाठी आली होती. मात्र नायगावमध्ये येऊनही तिला त्रास देणे सुरुच होते.   अखेर, महिलेने मनसे पदाधिकारी प्रफुल कदम यांच्याकडे तक्रार केली.  प्रफुल कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला ट्रॅप लावून पकडले. नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात त्याला पकडून बेदम चोप दिला. चोप देत त्याला वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post